मा. कैलास (नाना) नामदेव काकडे यांचा गौरवशाली इतिहास
बार्शी शहर सगळ्या साठी नवीन नाही
बार्शी शहरातील राजकारण सगळ्यात वेगळच असतं
आणि सगळ्याच त्याकडे लक्ष असते
पण बार्शीत सगळ्यात पहिले चळवळ उभारणं व वैचारिक समज व समाज कार्य पेरण्याचे काम फक्त मा.कैलास (नाना) नामदेव काकडे जी यांनी केले
बार्शीतील शिवजयंतीचे जनक
बार्शीच्या इतिहासातील पहिली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बार्शी शहरातील कसब्या मधल्या मातंग वस्तीतून सुरु झाली आणि या छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सर्वेसर्वा मा. कैलास (नाना) नामदेव काकडे जी होते
बार्शी मधील इतिहासातील पहिली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही बैल गाडीतून काढली होती
सामाजिक क्रांती आणि वैचारिक वारसा
बार्शी मधील महारवाड्यात व मांगवाड्यात डॉक्टर बाबासाहेबांचे विचार पोहचवण्याचे काम देखिल फक्त मा.कैलास (नाना) काकडे यांनी केलं
त्यांना बाबासाहेबांचा विचार एवढा बिलगला होता की त्यांनी वैदिकता पुर्णता घरातून भिरकाऊन दिली होती
तसेच बार्शीच्या इतिहासातील पहिले मातंगा मधील बौध्द पध्दतीने लग्न लावणारे नाना होते त्यांनी आपल्या मुलीचे बौध्द पध्दतीने लग्न लावून मातंग समाजा पुढे बाबासाहेब जिवंत केले होते परंतू समाज वैदिकतेने एवढा ग्रासलेला होता की त्यांना नानालाच महार केले
पण दुर्दैव असे की तेथील बौध्द (महार) पण नानाला मातंगच समजत कारण ते कागदी बौध्द नव्हते
आज महार या दुविधा मनस्थित जगत आहे की जो कागदी बौध्द तोच खरा पण बाबासाहेबांनी वर्तनातून बौध्द व्यक्ती ओळखावा असे म्हणतात पण दोन्ही समाज दुविधातच जगतोय आजकाल ची पीढी समजादार बनत आहे वैचारिक वारसा जपत आहे पण या सगळ्याचे श्रेय फक्त मा.कैलास (नाना) नामदेव काकडे यांच आर्पण होतय
कला आणि सांस्कृतिक योगदान
बार्शी मधील शिवशाहिर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यास फोटो अभावी गरज जाणवत होती त्या वेळी वाचण व अभ्यास करुन भाऊंचा फोटो स्वःता तयार करुन भाऊंची जयंती साजरी केली
बार्शी मधील फकिरा लेझिम संघाची स्थापना ही नाना यांनी केली
कामगारांचे कैवारी
बार्शीचा व्यापारा वरती पुर्ण मराठवाडा अवलंबून होता तसेच नगर पर्यंत बार्शीचा व्यापार पसरला होता पश्चिम महाराष्ट्राचा मधल्या बऱ्याच भागा मध्ये बार्शीचा व्यापार प्रसिध्द होता
बार्शी मधील बटाटा , कांदा आज ही दक्षिण भारता मध्ये पुरवला जातो
तसेच बर्शी मधील जनावरांचा बाजार ही प्रसिध्द होता व आहे
आशा काळी कामगारांची व मजुरांची गरज किती लागत असेल आपण समजू शकता
आशा काळी या कामगारांना फक्त जनावरा सारखे राबवून घेत त्यांच्या पोटाला पुरेसे अन्न ही मिळणे मुश्किलीचे होते
बार्शी मार्केट मधील कामगार , मजुर , हमाल , तोलार , वारणी कामगार गरजे पोटी मातीत पडलेले धान्य गोळा करुन घरी घेऊन जात त्याला धुवून त्या वरती आपला व आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरत असे पण
आशा काळी या कामगरांसाठी एक नेतृत्व उभे राहिले
त्यांनी या हतबल व मजबूर कामगारांसाठी बार्शी मध्ये इतिहासातील पहिले सरकारा तर्फे मोफत अन्न छत्र उभारले ते म्हणजे मा. कैलास (नाना) नामदेव काकडे जी होते
राजकारण पेक्षा समाज कार्य महान
त्यांना जर वाटले असते तर आज ते बार्शीच्या राजकारणात बादशाह असते
तसेच बार्शी मधल्या राजकारणात या दिलिप सोपल किंवा राजा राऊत यांना बार्शीत जागा कधीच भेटली नसती
पुर्णत: फक्त आणि फक्त मा.कैलास (नाना) नामदेव काकडे यांनी बार्शीचे राजकारण चालवले असते कारण त्यांच्या कडे वैचारीक व सामाजिक ज्ञान होते पण या आपल्या तळागळातील लोकांना समस्या मधून बाहेर कसे काढायचे या गोष्टीने व्यस्त होते
नाना आयुष्यभर संघर्षात जगले त्यांना लाचारी व गुलामगिरी पसंत नव्हती
जर तसे असते तर नाना यांनी कोट्यावधी संपत्ती चे मालक असते व आपल्या परिवाराला ते ती संपत्ती सोडून गेले असते
त्यांनी आयुष्यभर आपली जिवनचर्या व समाज कार्य एका गंजने ग्रस्त झालेली तोडकी मोडकी सायकल वरती घालवले व स्वःताला कोणा पुढे लाचार होऊ दिले नाही
मला आजून ही आठवते की त्याच विस्कळीत झालेल्या सायकल वरती एक वाक्य लिहलेले होते
आज ही ते आठवले तर कबूल च करावे लागते की ते खरच आहे ते वाक्या असे होते की जिवन एक संघर्ष
नाना चे पुर्ण जिवन संघर्षमय होते याला दुमत नाही
आज ते या जगात नाहीत तरी ही त्यांच्या जिवनातील त्यांचे संघर्ष त्यांचा पिछा सोडत नाही कारण
या नाव लौकिक बार्शी शहरातील मातीत नानांचा इतिहास कुणब्याच्या मातीत भेगाळलेल्या हातून बीया सोडाव्या तसा बार्शी करांनी सोडला आहे
आज जरी या मातीत मंद चंद्र प्रकाश झोकात नानांच्या आठवणीत गळणारे वृष्टी समान आश्रू पडून उद्या नक्की जो सुर्य उदय होइल त्याच सुर्याला न घाबरता व न कोमेजून जाता त्यांच्या कार्याचे फूल उगवेल त्यांची ओळख सुर्यफूल म्हणूनच
बार्शीकरानो आपल्या याही इतिहासाला जपण्याची गरज आहे
written by /article by Mulnivasi Yodha मूलनिवासी योध्दा